करुणा मुंडेंच्या पुढाकारातून बेरोजगारांच्या हाती रोजगार बीड जिल्ह्यातील ९५० सुशिक्षीत बेरोजगारांना मिळाली नोकरी



प्रतिनिधी रुपेश डोलारे

बीड, दि.२०)ः- तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून पुढाकार घेवून जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना हिताचा मार्ग घेत रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील साडे नऊशे सुशिक्षीत बेरोजगारांच्या हाती रोजगार देण्याचे काम करुणा मुंडेंनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये कंपन्यांचा अल्प प्रमाणामुळे जिल्ह्यातील सुशिक्षीत तरूणांच्या हाती कोयता येता. यामुळे त्याकुटूंबियांना नाहक येतना सहन करावा लागतात. या संकटातून सुशिक्षीत तरूणांना बाहेर काढण्यासाठी विविध नामांकित कंपन्यामध्ये तरुणांच्या हाती काम लागावे यासाठी स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडेंनी शुक्रवार दि.२० सप्टेंबर २०२४ रोजी भव्य महारोजगार मेळावा आयोजित करत जिल्ह्यातील साडे नऊशे सुशिक्षीत तरूणांच्या हाती रोजगार देण्याचे काम केले आहे. यामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून मुलाखतीच्या माध्यमातून विविध ठिकाणी तरूणांना रोजगारांच्या नियुक्तीचे पत्र देवून निवड केली. यामुळे जिल्ह्यातील अनेक तरुणांना रोजगार मिळाले असल्याचे म्हटले आहे. जिल्ह्यातील तरूणांच्या हाती काम लागले तर जिल्ह्याचा सर्वांगिण विकास होईल यासाठी करुणा मुंडेंनी महा रोजगार मेळावा आयोजित करत तरूणांना रोजगार मिळावून देण्याचे काम केले. यामुळे विविध तरूणांकडून करुणा मुंडेंचे आभार व्यत केले जात आहे. अनेक तरुणांना रोजगार मिळत नसल्याने तरूणांच्या हाती कोयता येत कबाड कष्ट करावे लागत असे यामुळे वेसनेच्या आहारी जाण्याचे प्रकार वाढत असल्याने कुटूंबिक वादही वाढतात. यामुळे या तरुणांच्या शिक्षणाचा उपयोग व्हावा तसेच त्यांच्या शिक्षणानंतर त्यांना रोजगार मिळावा यासाठी विविध जिल्ह्यातील नामांकित कंपन्याना निमंत्रण देवून जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम केले.


चौकट

तरूणांच्या सक्षमीकरणासाठी छोटासा प्रयत्न-करुणा मुंडे.


जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना कुठतरी योग्य मार्ग मिळावा यासाठी विविध जिल्ह्यातील नामांकित कंपन्यांना आमंत्रित करत महा रोजगा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यातून जिल्ह्यातील तरुणांच्या सक्षमीकरणासाठी छोटासा प्रयत्न करत हाताला काम दिला आहे असे मत करुणा मुंडे यांनी म्हटले आहे.