जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत होर्टी येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

  


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत होर्टी येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश संपादन केल्याबद्दल होर्टी ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक उपाशे सर माजी प्रा.व्यास कुलकर्णी साहेब सोसायटीचे माजी चेअरमन दत्ता राजमाने शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दत्ता भोसले सोसायटीचे संचालक संतोष मोरे व्यंकट महाबोले नवगिरे सर गिरी सर सोमनाथ गुंजिटे साईनाथ घोडके अशोक राजमाने व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते, 39 किलो गटातुन कार्तिकी दत्ता भोसले, जिल्ह्यात द्वितीय तर 42 किलो वजन गटात मंजिरी दत्ता घोडके जिल्ह्यात प्रथम व 54 किलो वजन गटात राधा सहदेव बोरगावे द्वितीय आणि प्रतिक भोसले व संग्राम कांबळे 48 किलो वजन गटात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकाविला त्याबद्दल ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.