राज्य सरकारने सोयाबीनला प्रति क्विंटल १०,००० रुपये भाव देण्यात यावा- आप चे मधुकर भैय्या शेळके यांची निवेदनाद्वारे मागणी

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव 

धाराशिव - आम आदमी पार्टी धाराशिव वतीने उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते 

श्री मधुकर शेळके यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे, दिलेले निवेदनात असे नमूद केले आहे की,राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या सोयाबीनला नऊ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव दयावा अशी मागणी निवेदनाद्वारे त्यांनी केली आहे,






      सदय स्थितीत शेतकऱ्याची आर्थीक परिस्थिती खराब आहे उत्पादन खर्च वाढलेला आहे त्यात बेभरवशाचा हवामान कधी जास्त प्रमाणात पाउस तर कधी अत्यल्प पाऊस कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणीत पूर्ण कोलमडून गेले आहे अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते पिकाला योग्य भाव नाही उत्पादन खर्चात वाढ झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.


   तरी मुख्यमंत्री  यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी त्याची आर्थिक परिस्थिती सुधारणा होण्याकरिता कृपया सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ ते दहा हजार रुपये भाव द्यावा अशी मागणी केली आहे,प्रतिनिधी बोलताना त्यांनी सांगीतले, मागे केंद्र सरकारने सोयाबीन आयात केल्यामुळे राज्यातील सोयाबीनला कमी भाव मिळत आहे,शेतकरी अडचणीत आहे तरी वरिल मागणीचा योग्य विचार करावा असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे, या निवेदनावर आपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर भैय्या शेळके यांंची स्वाक्षरी आहे.