तुळजापूर-सोलापूर महामार्गा लगत बारालिंग येथे पथदिवे व मार्गदर्शक फलक बसवण्याची निवेदनाद्वारे मागणी.

 

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.

तुळजापूर-सोलापूर महामार्गा लगत बारालिंग रस्त्यावरुन नवरात्र म्होत्सवासाठी सोलापूर मार्गावरील भाविक चालत तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येतात त्या भाविकांची गैरसोय होऊ नये व गतवर्षी या मार्गावर अंधार असल्यामुळे मृतदेह आढळून आला होता.तरी नगरपरिषदेने याबाबत तात्काळ निर्णय घेऊन सदर मार्गावर पथदिवे बसविणे बाबत व मार्गदर्शक फलक बसविणे बाबत नगरपरिषद येथे निवेदन देण्यात आले.यावेळी उपस्थित अनिकेत नरेश अमृतराव,राम चोपदार,भरत कोळगे,सौदागर पौळ,उदय गपाटे,गणेश गंधुरे,दादाराव जमदाडे आदींची स्वाक्षरी आहे.