तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश पवार यांच्या बदलिनिमित्त व नुतन सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरज देवकर यांच्या आगमनानिमित्त तामलवाडी पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांचा फेटा, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
तामलवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शैलेश पवार यांची नुकतीच मुंबई येथे बदली झाली. त्यांच्या जागेवर नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज दरेकर यांनी पदभार स्वीकारला असुन शैलेश पवार यांच्या बदलिनिमित्त व सुरज देवकर यांच्या आगमनानिमित्त तामलवाडी पोलिस ठाणे येथे दि.२४ सप्टेंबर रोजी छोटासा कार्यक्रम घेऊन त्यांचा फेटा, पुष्पगुच्छ व शाल देऊन पोलिस ठाण्याच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी तामलवाडी पत्रकार संघटनेच्या वतीनेही जेष्ठ पत्रकार अविनाश गायकवाड यांच्या हस्ते शैलेश पवार व सुरज देवकर यांचा फेटा, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला व शैलेश पवार यांना पुढील पदोन्नतीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज देवकर यांचेही स्वागत करण्यात आले.
यावेळी तामलवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा शिवरत्न न्यूजचे संपादक सर्जेराव गायकवाड, जेष्ठ पत्रकार तथा तरुण भारतचे उपसंपादक अविनाश गायकवाड,शिवरत्न न्यूजचे तामलवाडी प्रतिनिधी सचिन शिंदे,रवि घोटकर, बाळासाहेब डोलारे, आदी पत्रकार बांधवासह डॉ रविराज गायकवाड, दशरथ भाकरे,माऊली गुंड यांच्यासह पोलिस बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवाजी सिरसट यांनी केले.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.