तामलवाडी चेक पोस्टवर साडे पाच लाख रोकड जप्त.



प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

 दिनांक 26/10/24 रोजी 11.00 वा सुमारास सपोनि देवकर व स्टाफ असे पेट्रोलिंग करीत असताना तुळजापूर जाणारे रोडवर एक संशयास्पद वाहन मिळून आल्याने त्याच्याकडे चौकशी केली असता,त्यातील एक इसम नामे मुत्तू रघुनाथ आशिलकर वय 24 वर्ष , राहणार बनहट्टी तालुका बनहट्टी जिल्हा बागलकोट,कर्नाटक याने त्याच्याकडे साडेपाच लाख रुपये कॅश असल्याचे सांगितले. त्यामुळे सदर वाहनाला आम्ही चेकिंग कामे एस एस टी तामलवाडी पॉईंट येथे घेऊन आलो. सदर वाहनाची झडती घेतली असता सदर वाहन क्रमांक KA 23 P 0871मधून साडेपाच लाख रुपये रोख रक्कम मिळून आली आहे सदरची रक्कम पंचा समक्ष एसएसटी पॉईंट तामलवाडी येथे व्हिडिओग्राफी करून जप्त करण्यात आली आहे. हि कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर डॉक्टर निलेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.