होर्टी पं.स.गणातून देवकी गायकवाड यांची भाजपकडे उमेदवारीची मागणी



माजी सरपंच यशवंत गायकवाड यांची सून तसेच ग्रामपंचायत सदस्य सुधाकर गायकवाड यांच्या पत्नी सौ. देवकी सुधाकर गायकवाड यांनी होर्टी पंचायत समिती गणातून भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

देवकी गायकवाड या माजी सरपंच होर्टी ज्ञानेश्वर भोसले यांच्या लेकी असून माजी सरपंच मुर्ठा येथील आशाताई गुंजकर यांच्या भाची आहेत.

सुधाकर गायकवाड यांचा होर्टी गणात चांगला जनसंपर्क असून स्थानिक पातळीवर त्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे