होर्टी प.स.गणासाठी सौ. गोकर्णा भोसले यांची शिवसेनेकडे उमेदवारी मागणी.

 


तुळजापूर तालुक्यातील होर्टी प.स.गण सर्वसाधारण महिलांसाठी ओपन झाला आहे. या प.स.गणासाठी होर्टी येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख दत्ता भोसले यांच्या पत्नी, सौ. गोकर्णा दत्ता भोसले यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) कडे उमेदवारी मागितली आहे.


होर्टी प.स.गणात चिकुंद्रा, मुर्टा, होर्टी, मानमोडी, वडाचा तांडा या गावांसह सर्व तांडे, जळकोटवाडी आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेले किलज हे गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये दत्ता भोसले यांचा मोठा जनसंपर्क असल्याने पक्षाकडे उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे.