शेतकऱ्यांनो, आपला शेतमाल फक्त बाजार समितीच्या आवारातच विक्री करा,तुळजापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे शेतकऱ्यांना जाहिर व विनम्र आवाहन



तुळजापूर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की, आपला शेतमाल फक्त बाजार समितीच्या आवारातच विक्री करावा.

हे आपल्या सुरक्षिततेसाठी व आर्थिक हितासाठी आवश्यक आहे.



---


📌 महत्वाच्या सूचना :


1️⃣ परवानाधारक व्यापारीकडेच विक्री करा

फक्त बाजार समितीचा परवाना असलेल्या व्यापाऱ्यांनाच शेतमाल विकावा.


2️⃣ गुलाबी पावती घ्या (बाजार समिती शिक्क्यासह)

शेतमाल विक्री केल्यानंतर व्यापाऱ्याकडून बाजार समितीची शिक्का असलेली गुलाबी पक्की पावती घ्यावी.

👉 कोऱ्या पावत्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.

👉 पक्की पावती असल्यास रक्कम उशिरा मिळाल्यास तक्रार करता येईल.

👉 शासनाच्या योजनांचा (उदा. भावफरक योजना, अनुदान इ.) लाभ घेता येईल.


3️⃣ वजनकाटा प्रमाणित असल्याची खात्री करा

व्यापाऱ्याचा वजनकाटा वजनकाटा निरीक्षकांनी प्रमाणित केलेला आहे याची खात्री करावी.


4️⃣ २४ तासांच्या आत रक्कम मिळवा

शेतमाल विक्रीनंतर ताबडतोब (२४ तासांच्या आत) रक्कम घ्यावी.


5️⃣ ७ दिवसांपेक्षा विलंब झाल्यास तक्रार करा

व्यापारी रक्कम देण्यास ७ दिवसांपेक्षा अधिक वेळ घेत असल्यास बाजार समिती कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधा.


6️⃣ भुलथापांना बळी पडू नका

बाजारभावापेक्षा जास्त रक्कम देण्याचे आमिष (उदा. ६ महिन्यांनंतर पैसे, चेक, अनामत इ.) दाखवणाऱ्या व्यापाऱ्यांपासून सावध रहा.

आपला कष्टाचा शेतमाल अशा फसवणुकीच्या जोखमीपासून दूर ठेवा.






⚠️ शेतकरी बांधवांनी सुचनांचे काटेकोर पालन करावे.


बाजार समितीकडे वारंवार तक्रारी येत असल्याने आपण सर्वांनी जागरुक राहणे आवश्यक आहे.

रक्कम मिळण्यास ७ दिवसांपेक्षा अधिक विलंब झाल्यास पक्क्या पावतीसह बाजार समिती कार्यालयात तक्रार नोंद करावी, जेणेकरून संबंधित व्यापाऱ्यांवर योग्य कारवाई करता येईल.



---


📞 संपर्कासाठी :


श्री. उमेश भोपळे – सचिव

📱 ९९७५७२०५८४


श्री. सुहास गायकवाड – उपसभापती

📱 ७३८५२५२५२५


श्री. आशिष सोनटक्के – सभापती

📱 ९६८९४०४४४४



---


तुळजापूर कृषि उत्पन्न बाजार समिती,

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कटिबद्ध