काक्रंबा जिल्हा परिषद गटातून ॲड. रामचंद्र ढवळे यांची उमेदवारीसाठी इच्छुक — शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडे मागणी करणार


काक्रंबा जिल्हा परिषद गटातून प्रतिष्ठित समाजसेवक, लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आणि तुळजापूर बाजार समितीचे संचालक ॲड. रामचंद्र ढवळे यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.


धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर,तसेच धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास दादा पाटील,यांच्या नेतृत्वाखाली ऋषिकेश भैय्या मगर यांच्या माध्यमातून ॲड. ढवळे हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडे उमेदवारीसाठी अधिकृत मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. स्थानिक पातळीवर त्यांनी शिक्षण, कायदा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून, ग्रामविकासासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत.


जनतेशी असलेला त्यांचा घनिष्ठ संपर्क आणि नेतृत्वगुण यामुळे ॲड. रामचंद्र ढवळे यांना स्थानिक पातळीवर मोठा जनाधार लाभला आहे. त्यामुळे काक्रंबा जिल्हा परिषद गटातील त्यांच्या उमेदवारीची चर्चा सध्या तालुकाभर रंगत आहे.


महाविकास आघाडीकडे अधिकृतपणे उमेदवारीची मागणी करणार असल्याचे ॲड. ढवळे यांनी स्पष्ट केले असून, त्यांची उमेदवारी ही स्थानिक राजकारणात लक्षवेधी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.