दि. 15 ऑक्टोबर 2025 रोजी तुळजापूर येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत खासदार ओमदादा निंबाळकर व आमदार कैलासदादा पाटील यांच्या कार्यशैलीची व जनसंपर्काची प्रशंसा करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वामुळे संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेचा प्रभाव वाढला असून, तुळजापूर शहरातून खासदार ओमदादांना लोकसभा निवडणुकीत मिळालेले मोठे मताधिक्य हे पक्षाच्या बळकटीचे प्रतीक असल्याचे मत मांडण्यात आले.
बैठकीत चर्चा करताना हे स्पष्ट करण्यात आले की, शिवसेना स्वबळावर आगामी निवडणुका लढविणार असून, पक्षात सुरू असलेल्या मोठ्या प्रवेशांमुळे उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे.
या प्रसंगी शहर प्रमुख राहुल भैय्या खपले, उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, बापूसाहेब नाईकवाडी, शहर संघटक अर्जुन आप्पा साळुंके, युवा नेते ऋषी भैय्या मगर, भरत जाधव, विकास भोसले, अनमोल साळुंके, अनंत क्षीरसागर, नवनाथ जगताप, सागर इंगळे, बळीराम जगताप, कालिदास नाईकवाडी, रवी लबडे, विनोद बनसोडे, ओम मगर, अरुण जगदाळे, प्रसाद उंडरे, विकी वाघमारे, महावीर कंदले, सचिन कोकीळे, स्वरूप कांबळे, अंबेश्वर देशमुख, सुरेश कदम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.