आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते दिवाळी किराणा किटचे वाटप — ५००० कुटुंबांना मदतीचा हात


तिर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील गोरगरीब व कष्टकरी कुटुंबीयांना दिवाळीचा सण आनंदात साजरा करता यावा, या हेतूने युवा नेते विनोद (पिटूभैय्या) गंगणे यांच्या वतीने गेली सलग १६ वर्षे “दिवाळी किराणा किट वाटप” हा उपक्रम राबविला जात आहे.


प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी भाऊबीजच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना मदतीचा हात म्हणून किराणा किटचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दिनाक,१८ ऑक्टोंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता हाडको मैदान, तुळजापूर येथे पार पडणार आहे.


या कार्यक्रमास आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजप नेते सुनील चव्हाण, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तालुकाध्यक्ष आनंद कंदले, सज्जन सांळुके व शांताराम पेंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा आणि भावनिक नात्याचा साजरा करणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून विनोद गंगणे यांच्या पुढाकाराने दरवर्षी सातत्याने राबविला जात आहे.