तुळजापूर तालुक्यातील बारूळ येथील तरुण व उत्साही समाजसेवक सुरज रुद्रापा सगट यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत काक्रंबा गटातून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे.
सुरज सगट हे बालपणापासूनच सामाजिक कार्यात सक्रिय असून, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, तसेच युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
ग्रामविकास हाच खरा विकास या भूमिकेतून त्यांनी आपल्या कार्याला दिशा दिली आहे. विविध समाजघटकांना एकत्र ठेवून गावागावात एकतेचा संदेश त्यांनी दिला आहे. कोरोना काळात आणि दुष्काळी परिस्थितीत त्यांनी गरीब, शेतकरी आणि गरजू नागरिकांसाठी मदतकार्य राबवून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण निर्माण केले.
सुरज सगट यांनी सांगितले की, "जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद मिळाल्यास माझा प्रयत्न प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास साधण्यात असेल. पारदर्शक, जनतेच्या हिताचा आणि लोकाभिमुख कारभार करणे हेच माझे ध्येय आहे."
त्यांच्या या इच्छुकतेची चर्चा सध्या काक्रंबा जिल्हा परिषद गटात जोरदारपणे होत असून, स्थानिक पातळीवर अनेक समाजघटक त्यांना पाठिंबा दर्शवत आहेत
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.