तुळजापूर तालुक्यातील येवती येथील अंजली तांबे हिला मोडी लिपी परीक्षेत उत्कृष्ट यश



पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत व्ही.जी. शिवदारे कॉलेज, सोलापूर येथे आयोजित मोडी प्रशिक्षण वर्गाच्या अंतर्गत २० सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या मोडी परीक्षेत अंजली तांबे हिने उत्कृष्ट गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.


अंजली तांबे सध्या बालाघाट शिक्षण संस्था, नळदुर्ग येथे बारावी वर्गात शिक्षण घेत आहे.


या प्रशिक्षणामुळे ऐतिहासिक मोडी लिपीतील कागदपत्रे, शिलालेखांचे वाचन तसेच विद्यार्थ्यांना आणि शासकीय कार्यालयातील कर्मचारी वर्गाला जुन्या कागदपत्रांच्या अभ्यासासाठी मोठी मदत होणार आहे.



अंजली तांबे म्हणाली, “मला या प्रशिक्षणातून केवळ लिपीची अक्षरे शिकायला मिळाली नाहीत, तर हिंदवी स्वराज्याच्या गुप्त दालनांची किल्ली माझ्या हाती मिळाली आहे. इ.स. १३व्या शतकापासून १९६० पर्यंत महाराष्ट्रातील प्रशासन, न्याय, करप्रणाली आणि व्यापाराचे दस्तऐवज मोडी लिपीत लिहिले गेले आहेत. यादव, बहामनी, निजामशाही, आदिलशाहीपासून मुघलांपर्यंत सर्वांनी मोडीचा वापर केला.”


तिने पुढे सांगितले की, “मोडी लिपीचा खरा सुवर्णकाळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुरू झाला. स्वराज्याचे दप्तरे, हुकुमनामे, महसूल नोंदी आणि आज्ञापत्रे यांमध्ये मोडी लिपीचा ठसा आहे. या ऐतिहासिक दस्तऐवजांचा ठेवा जनतेसमोर आणण्याचा माझा प्रयत्न असेल.”