धाराशिव नगरपरिषद : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून प्रभाग 13-ब मधून सौ. रोहिणी प्रताप इंगळे यांची उमेदवारी दाखल

 


धाराशिव – आगामी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटातर्फे प्रभाग क्रमांक 13-ब मधून सौ. रोहिणी प्रताप इंगळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल करण्याच्या वेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. प्रभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि महिलांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून सक्षम नेतृत्व देण्याचा विश्वास सौ. इंगळे यांनी व्यक्त केला.