पुणेच्या श्री नंदू कुंभार यांची श्री तुळजाभवानी मंदिराला 60 हजारांचा आधुनिक संगणक भेट


तुळजापूर – पुणे येथील व्यावसायिक श्री नंदू कुंभार यांनी सामाजिक बांधिलकी जपत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या धार्मिक विभागाला 60,000 रुपये किंमतीचा आधुनिक संगणक भेट स्वरूपात प्रदान केला.




ही भेट आज धार्मिक विभागाकडे अधिकृतरित्या सुपूर्द करण्यात आली. संगणकाची स्वीकृती धार्मिक व्यवस्थापक यांच्या स्वाधीन करण्यात आली.

या प्रसंगी धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले, अनुप ढमाले, रामेश्वर वाले, सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम तसेच मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संस्थानच्या वतीने श्री नंदू कुंभार यांचे या मौल्यवान भेटीसाठी मनःपूर्वक आभार मानण्यात आले असून, या योगदानामुळे धार्मिक विभागातील कामकाज अधिक सुलभ व आधुनिक पद्धतीने होण्यास मदत होणार असल्याचे संस्थानने नमूद केले