तुळजापूर नगरपरिषदेत काँग्रेसचा दमदार प्रवेश – तीन प्रभागांतून उमेदवारी अर्ज दाखल महाविकास आघाडी काँग्रेसचे रणजीत इंगळे, रसाळ दांपत्य आणि आनंद जगताप मैदानात तुळजापूरमध्ये काँग्रेसकडून प्रभाग 7, 9 व 10 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल


तुळजापूर नगरपरिषद निवडणूक – महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल


तुळजापूर : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी आज मोठ्या उत्साहात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.


प्रभाग क्र. 7 मधून श्री रणजीत भैया इंगळे आणि सौ. आरती रणजीत इंगळे,

प्रभाग क्र. 9 मधून श्री श्रीकांत आप्पा रसाळ आणि सौ. मोनिका श्रीकांत रसाळ,

तर प्रभाग क्र. 10 मधून श्री आनंद मलाक जगताप

यांनी अधिकृतपणे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

अर्ज दाखल करताना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुकीत जनतेचा विश्वास संपादन करून विकासाची नवी दिशा देण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला.