तामलवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या प्रभावी कारवाईत अवैध देशी दारू तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणातील गुळमिश्रीत रसायनाचा साठा जप्त करण्यात आला असून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे.
दि. 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता, खडकी शिवारातील गट क्र. 202 येथील शेतात छापा मारण्यात आला. यावेळी गोरख थावरू राठोड (वय 61, रा. वडजी तांडा, ता. दक्षिण सोलापूर) हा अवैध दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे गुळमिश्रीत व उग्र वासाचे रसायन मोठ्या प्रमाणात बाळगत असल्याचे आढळले.
कारवाईत 15 प्लास्टिक बॅरेलमधील 1500 लिटर फसफसणारे रसायन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ₹1,05,000/- एवढी आहे.
या प्रकरणात प्रो. गु.र. नं. 165/2025, कलम 65(फ) मद्यनिषेध कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी म्हणून पो.ना. सूरज विश्वनाथ नरवाडे (पोकॉ 1523) यांनी माहिती दिली.
आरोपीचा पूर्वी मद्यनिषेध कायद्यात दोन गुन्ह्यांचा इतिहास असल्याचे तपासात समोर आले आहे.
---

