तुळजापूरच्या प्रभाग ५ मध्ये राकेश चोपदार यांची उमेदवारी चर्चेत; शरद पवार गटाचा विश्वासू घराण्यावर पुन्हा भर

 


तुळजापूर (प्रतिनिधी) — नगरपरिषद निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना प्रभाग क्रमांक ५ मध्ये राजकीय समीकरणांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून राकेश राजाभाऊ चोपदार यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून जोरदारपणे पुढे येत असून, या प्रभागातील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.


व्यवसाय क्षेत्रात परिचित आणि सामाजिक उपक्रमांत सक्रीय सहभागामुळे राकेश चोपदार हे “प्रभावी युवा नेतृत्व” म्हणून स्थानिकांमध्ये विशेष लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे प्रभागात नव्या चेहऱ्याकडून ठोस विकासाच्या अपेक्षा वाढू लागल्या आहेत.


चोपदार घराण्याचा प्रभाव आणि निष्ठेला मान्यता?


शहराध्यक्ष अमर चोपदार यांनी पक्षातील अनेक बदलांच्या काळातही शरद पवार गटाशी निष्ठा कायम राखली होती. त्यांच्या या भूमिकेची दखल पक्षश्रेष्ठींनी नेहमीच घेतली आहे. आता त्याच घराण्यातील युवक राकेश यांच्या नावाला मिळत असलेला पाठिंबा म्हणजे पक्षाकडून “निष्ठेचा सन्मान” असे मानले जात आहे.


प्रभाग ५ मधील तरुण मतदार राकेशकडून नव्या विचारांचा, नवी ऊर्जा घेऊन काम करणाऱ्या उमेदवाराची अपेक्षा व्यक्त करीत आहेत.

येत्या काही दिवसांत पक्षाची अधिकृत घोषणा होणार असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे