सौ. मिनाताई अभिमान कांबळे यांची शिवसेनेकडे नगरसेवक उमेदवारीची मागणी. तुळजापूरमध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेनेला नवा चेहरा — मिनाताई कांबळे रिंगणात उतरायला सज्ज महिलांच्या आवाजाला बळ देण्यासाठी मिनाताई कांबळे पुढे सरसावल्या

 





सौ. मिनाताई अभिमान कांबळे यांची शिवसेनेकडे नगरसेवक उमेदवारीची मागणी.


तुळजापूरमध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेनेला नवा चेहरा — मिनाताई कांबळे रिंगणात उतरायला सज्ज

 महिलांच्या आवाजाला बळ देण्यासाठी मिनाताई कांबळे पुढे सरसावल्या


तुळजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये समाजाभिमुख कार्यकर्त्या तथा जनसंपर्कात सक्रिय असलेल्या, वारकरी सांप्रदायिक सौ. मिनाताई अभिमान कांबळे यांनी आगामी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे नगरसेवकपदासाठी उमेदवारीची मागणी केली आहे.


स्थानिक पातळीवर नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान देणाऱ्या मिनाताई कांबळे यांना परिसरातील महिलांचा आणि युवकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. त्यांनी आपल्या उमेदवारीच्या माध्यमातून शहरातील विकास आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे उमेदवारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, तुळजापूर शहरातील नागरिकांचे लक्ष आता शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या) निर्णयाकडे लागले आहे.