तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक 8 चा, आपला हक्काचा माणूस अक्षय (भैय्या) कदम परमेश्वर निवडणुकीच्या रिंगणात


तुळजापूर शहर | प्रभाग क्रमांक ८


तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक आठमध्ये आपला हक्काचा माणूस म्हणून ओळख असणारे अक्षय भैय्या कदम परमेश्वर हे सामान्य नागरिकांच्या विश्वासाचे प्रतीक म्हणून उदयास आले आहेत. दांडगा जनसंपर्क, नागरिकांसाठी तत्पर सेवा आणि सर्व समाजघटकांमध्ये निर्मित झालेला आदर यामुळे त्यांनी भक्कम जनाधार तयार केला आहे.


अक्षय भैय्या कदम परमेश्वर यांनी गोरगरीब व गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मोठी कामगिरी केली आहे. श्रावणबाळ योजना, संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना अशा विविध योजनांमधून वृद्ध, विधवा, परितक्ता महिलांसह अनेक लाभार्थ्यांना त्यांनी मानधन मिळवून दिले आहे. जनतेच्या अडीअडचणीला तत्परतेने धावून जाणे आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणे ही त्यांची कार्यशैली ठरली आहे.


गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच सक्रिय राहिले असून मोर्चे, आंदोलने, निवेदने या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत आले आहेत. न्याय मिळेपर्यंत झगडणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख शहरभर दृढ झाली आहे.

सर्व जाती-धर्मांमध्ये त्यांचा व्यापक जनसंपर्क असून समाजाच्या प्रत्येक घटकातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. या जनाधाराच्या जोरावर अक्षय भैय्या कदम परमेश्वर यांनी आगामी तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी संपूर्ण ताकदीनिशी तयारी सुरू केली आहे.

तुळजापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेला, न्यायासाठी लढणारा आणि नागरिकांच्या सुख-दु:खात सदैव सोबत उभा राहणारा असा विश्वासार्ह चेहरा म्हणून ते पुढे येत आहेत.