येरमाळा : टाटा पॉवरच्या स्टोरेज यार्डमध्ये जाळपोळ; 15 ते 20 अज्ञातांकडून 8 लाखांचे नुकसान, कडकनाथवाडी शिवारात टाटा पॉवर कंपनीच्या वाहनाला आग; मोठ्या प्रमाणात तोडफोड


येरमाळा पोलीस ठाणे : जाळपोळ व तोडफोडीची घटना – गुन्हा दाखल

येरमाळा पोलीस ठाणे हद्दीत दि. 29/12/2025 रोजी सायंकाळी सुमारे 8.00 वाजता कडकनाथवाडी शिवारातील टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड (कळंब कंपनी) यांच्या स्टोरेज यार्डमध्ये गंभीर स्वरूपाची घटना घडली आहे.

अज्ञात 15 ते 20 इसमांनी अज्ञात कारणावरून कंपनीच्या वाहनास आग लावून जाळपोळ केली तसेच तोडफोड करून अंदाजे ₹8,00,000/- (आठ लाख रुपये) इतके नुकसान केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी फिर्यादी फैज अन्वर फैजी, वय 29 वर्षे, व्यवसाय – साईट सुपरवायझर, संगवी मुव्हर्स लिमिटेड कंपनी, रा. न्यू शितलनगर, व्हिटीसी, जालंधर-1, जि. जालंधर, पंजाब (सध्या रा. शिवाजी चौक, वाशी, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी दि. 30/12/2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून येरमाळा पोलीस ठाण्यात

भा.न्या.सं. कलम 324(5), 326(एफ), 191(2), 189(2), 190 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

घटनेचा पुढील तपास येरमाळा पोलीस करीत आहेत.