तुळजापूर येथे,भिम-आण्णा सामाजिक संघटनेच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार सोहळा!

 


तुळजापूर (प्रतिनिधी): महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतीकारी विचारांनी प्रेरित भिम-आण्णा सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने संघटनेचा ५ वा वर्धापन दिन तसेच क्रांतीवीर फकिरा राणोजी साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यस्तरीय महाराष्ट्र सामाजिक कार्य गुणगौरव पुरस्कार सोहळा व मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हा भव्य सोहळा रविवार, दिनांक ०१ मार्च २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता तुळजापूर येथील शारदा मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे. सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात येणार असून राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. सुरेश (आप्पा) भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमात सामाजिक प्रबोधनपर मार्गदर्शनही होणार आहे.
कार्यक्रमास उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


संपर्क:
मयुर (भाऊ) साळुंके – ता. अध्यक्ष, औसा – 9604544587
राम (भाऊ) कांबळे – ता. अध्यक्ष, तुळजापूर – 9172505858