येवतीचे सुपुत्र मोहन (भैय्या) बडूरे यांची महाराष्ट्र राज्य वेट्रन्स क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्षपदी निवड येवती गावाचा अभिमान! मोहन बडूरे राज्य वेट्रन्स क्रिकेट संघटनेच्या उपाध्यक्षपदी



ता. तुळजापूर : येवती गावचे सुपुत्र श्री. मोहन (भैय्या) महादेव बडूरे यांची महाराष्ट्र राज्य वेट्रन्स क्रिकेट असोसिएशन च्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. त्यांच्या या निवडीमुळे येवती गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
क्रिकेट क्षेत्रातील दीर्घ अनुभव, संघटन कौशल्य व खेळाडूंप्रती असलेली बांधिलकी यामुळे त्यांची या महत्त्वाच्या पदावर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील वेट्रन्स क्रिकेटला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या निवडीबद्दल समस्त ग्रामस्थ येवती व मित्रपरिवार यांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.