भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सेवा दलमध्ये शिवाजीराव गायकवाड यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवाजीराव गायकवाड यांचा सत्कार सोहळा, शिवाजीराव गायकवाड यांची प्रदेश सचिवपदी निवड; छत्रपती संभाजीनगर येथे सन्मान !

 

छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सेवा दलच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात शिवाजीराव गायकवाड यांची महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचा सन्मान प्रदेशाध्यक्ष मा. विलासजी (बापू) अवताडे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थित राहून शिवाजीराव गायकवाड यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. संघटनेची ताकद वाढविणे, तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देणे तसेच सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविणे यासाठी ते सक्रियपणे कार्य करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


या प्रसंगी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विलास शाळू, जिल्हा उपाध्यक्ष संजय गुंजुटे, दादासाहेब चौधरी (माजी सरपंच, जवळगा मेसाई), गणेश शिंदे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.