आठवडा बाजारात पारधी समाजातील भाविकांची तहान भागवली; मोफत पाणी टँकरची व्यवस्था.



तुळजापूर येथील आठवडा बाजार परिसरात पारधी समाजातील मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. मात्र त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत होती. उष्ण वातावरणात पाण्याअभावी भाविकांना त्रास सहन करावा लागत असल्याची बाब लक्षात येताच तत्काळ सामाजिक जबाबदारी पार पाडत मदतीचा हात पुढे करण्यात आला.

नगराध्यक्ष श्री वीनोद पिटु भैय्या गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल दादा भोसले यांच्या तर्फे तात्काळ मोफत पाणी टँकरची व्यवस्था करण्यात आली. यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या गैरसोयीचे निराकरण झाले.

स्थानिक नागरिक व भाविकांनी या उपक्रमाचे स्वागत करत, वेळेवर केलेल्या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले. सामाजिक बांधिलकी जपत गरजू भाविकांसाठी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद ठरत असून, मानवतेचा सुंदर संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.