संत रविदास चर्मकार युवा महासंघ फौंडेशनकडून बालाजी कांबळे यांची मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती


तुळजापूर : संत रविदास चर्मकार युवा महासंघ फौंडेशन (अराजकीय संघटना) यांच्या वतीने श्री. बालाजी दिलीप कांबळे यांची मराठवाडा विभागीय अध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. दत्तात्रय आत्माराम कदम यांनी नियुक्ती पत्राद्वारे ही घोषणा केली.

चर्मकार समाजातील युवा शक्ती संघटित करून सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक प्रश्न सोडविण्यासाठी बालाजी कांबळे सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन संघटनेच्या वतीने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


संघटनेच्या माध्यमातून चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणे, सामाजिक कामांचा आढावा घेणे, आरोग्य व वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करणे, तसेच युवकांना संघटित करून समाजोपयोगी कार्य अधिक प्रभावीपणे राबविणे, अशी अपेक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

तसेच रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, वृद्धाश्रम व अनाथाश्रम भेटी, तसेच आरोग्य जनजागृती अभियान यांसारखे उपक्रम मराठवाडा विभागात अधिक जोमाने राबविण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या नियुक्तीबद्दल संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मा. ज्ञानदेव कदम, प्रदेश सचिव मा. देवप्पा शिंदे, प्रदेश संपर्क प्रमुख मा. रविद्र खामकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्री. बालाजी कांबळे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.