पंचायत समिती सदस्य किसन भाऊ देडे यांचा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम काक्रंबा केंद्रावर विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; पेन-गुलाब देत दिल्या शुभेच्छा.
काक्रंबा : इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेला प्रारंभ होताच काक्रंबा येथील संजविनी माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. पंचायत समिती सदस्य किसन देडे यांच्या वतीने परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना पेन व गुलाब पुष्प देऊन उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. बोर्ड परीक्षेच्या पहिल्याच दिवशी परीक्षा केंद्र परिसरात सकारात्मक व प्रेरणादायी वातावरण पाहायला मिळाले. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि उत्साह स्पष्ट दिसत होता. यावेळी “तणाव न घेता आत्मविश्वासाने परीक्षा द्या, यश तुमचेच आहे,” असा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. या स्वागत उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक व्यक्त केले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि परीक्षेचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भोसले सर, ठोकरे मॅडम, किरण वाघमारे सर, अनिल भारती, उमेश पांडगळे, अनिल देडे, ज्ञानेश्वर वाघमारे, अजित चंदनशिवे, गौरी राऊत, शाम सुरवसे, बाबासाहेब चंदनशिवे, अनंत राऊत, हरी कोळेकर, समाधान पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम शांत, शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.