सांगवी मार्डी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक लाटकर साहेब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


सांगवी मार्डी (ता. तुळजापूर) येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक लाटकर साहेब यांचा वाढदिवस गावात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी गावचे सरपंच युवराज आप्पा बागल, उपसरपंच सतीश बागल तसेच तलाठी शिंदे साहेब यांच्या हस्ते लाटकर साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी सर्वांनी लाटकर साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.