तुळजापूर पोलीस ठाण्यात ACB चा सापळा; सहाय्यक उपनिरीक्षक 5 हजारांची लाच घेताना पकडला,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिवची कारवाई तुळजापूर पोलीस स्टेशन आवारात सापळा; ACB कडून यशस्वी कारवाई. 15 हजारांची मागणी, 5 हजारांवर सौदा; अखेर ACB च्या कारवाईत पोलीस अधिकारी ताब्यात

 



धाराशिव : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, युनिट धाराशिव यांच्या वतीने दिनांक 04 मार्च 2026 रोजी यशस्वी सापळा कारवाई करण्यात आली असून तुळजापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात कलम वाढ न करण्यासाठी तसेच मोटारसायकल जप्त न करण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्याने यापूर्वी 10 हजार रुपये स्वीकारले होते. तसेच पुढील कारवाई टाळण्यासाठी 15 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव यांच्याकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर दिनांक 04 मार्च 2026 रोजी तुळजापूर पोलीस स्टेशन परिसरात सापळा रचण्यात आला. तडजोडीअंती 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपीस रंगेहाथ पकडण्यात आले.
सदर आरोपीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तुळजापूर पोलीस स्टेशन येथे सुरू आहे.
कारवाईदरम्यान आरोपीच्या अंगझडतीत 5,300 रुपये रोख रक्कम, एक मोबाईल हँडसेट, पांढरा रुमाल, निळा कंगवा, एक पेन, पाच चाव्यांचा गुच्छ, पोलीस ओळखपत्र व काळा चष्मा मिळून आला आहे. मोबाईल तपासणी व घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे (सापळा अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पोलीस निरीक्षक विजय वगरे करीत असून पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांचे आहे. मार्गदर्शन पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे (ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर) यांचे लाभले.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास तात्काळ संपर्क साधावा.
तक्रारीसाठी संपर्क :
टोल फ्री क्रमांक – 1064
व्हॉट्सअ‍ॅप – 9270231064
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर – 9011092777
पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव –