सांगवी मार्डी गावचे युवा उद्योजक जोतिबा (पिंटू) बागल यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन


तुळजापूर : सांगवी मार्डी गावचे युवा उद्योजक तथा हॉटेल वृंदावनचे मालक श्री. जोतिबा (पिंटू) बागल यांचा वाढदिवस साधेपणाने व उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांना गावच्या वतीने मनःपूर्वक अभिष्टचिंतन व हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

व्यवसाय क्षेत्रात जिद्द, प्रामाणिकपणा आणि कष्टाच्या जोरावर श्री. बागल यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या यशस्वी वाटचालीमुळे परिसरातील अनेक युवकांना उद्योजकतेची प्रेरणा मिळत आहे. तसेच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला त्यांनी हातभार लावला आहे.

याप्रसंगी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व व्यवसायात अधिकाधिक यश लाभो, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.