तुळजापूर येथे भिम-आण्णा सामाजिक संघटनेचा ५ वा वर्धापन दिन उत्साहात; बालाजी कांबळे यांना राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार प्रदान

तुळजापूर : भिम-आण्णा सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने तुळजापूर येथे आयोजित करण्यात आलेला ५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

या सोहळ्यात सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल बालाजी कांबळे यांना राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

भिम-आण्णा सामाजिक संघटना गेल्या पाच वर्षांपासून समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबवत आहे. संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील कार्यकर्त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला असून, उपस्थितांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक केले.