तुळजापूर येथे भिम-अण्णा सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य) चा ५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा



तुळजापूर : दि. 01 मार्च 2026 रोजी भिम-अण्णा सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य) चा ५ वा वर्धापनदिन तसेच क्रांतीवीर फकिरा राणोजी साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र सामाजिक कार्य गुणगौरव पुरस्कार सोहळा 2026’ मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम तुळजापूर येथील शारदा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.


संस्थापक अध्यक्ष सुरेश (आप्पा) भिसे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आरोग्य, पत्रकारिता, कामगार अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी भिम-अण्णा सामाजिक संघटना – धाराशिव जिल्हा व लातूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेच्या कार्याचा आढावा घेत सामाजिक बांधिलकी जोपासत पुढील काळात अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला