तुळजापूर : “एक धाव आरोग्यसेवा भक्तीसाठी” हे ब्रीद घेऊन आयोजित करण्यात आलेली पहिली तुळजाई रोटरी मॅरेथॉन तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाली. आरोग्य, व्यायाम आणि फिटनेसबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब तुळजापूर यांच्या वतीने विठाई हॉस्पिटल प्रस्तुत या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे आयोजन नगराध्यक्ष विनोद पिटू गांगणे यांच्या सहकार्याने करण्यात आले. मॅरेथॉनमध्ये ३, ५ आणि १० किलोमीटर अशा विविध प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. पहाटे देवीपूजनाने सुरुवात मॅरेथॉनची सुरुवात पहाटे साडेपाच वाजता श्री तुळजाभवानी देवीच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून झाली. त्यानंतर पुणे येथील विशाल कुमार आणि अमित यांनी झुंबा सादर करून उपस्थित धावपटूंमध्ये उत्साह निर्माण केला. मान्यवरांच्या हस्ते फ्लॅग ऑफ सकाळी ठीक सहा वाजता १० किलोमीटर मॅरेथॉनला फ्लॅग ऑफ देऊन स्पर्धेची अधिकृत सुरुवात करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष विनोद पिटू गांगणे, तहसीलदार अरविंद बोळंगे, माजी प्रांतपाल विष्णू मोंढे, ज्येष्ठ रोटरीयन आप्पासाहेब पाटील, कुंदन कोंडो, विष्णू अंबर, रोटरी अध्यक्ष संतोष लोखंडे व सचिव राहुल तागड उपस्थित होते. राज्यभरातून धावपटूंचा सहभाग या मॅरेथॉनमध्ये पुणे, सांगली, मुंबई, लातूर, बीड, सोलापूर, धाराशिव आदी ठिकाणांहून आलेल्या धावपटूंनी सहभाग घेतला. शहरातील युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. स्पर्धा १२–१८, १९–२५, २६–३५, ३६–४५, ४६–५५ आणि ५५ वर्षांवरील अशा विविध वयोगटांमध्ये घेण्यात आली. एकूण ३९ बक्षिसे विजेत्यांना प्रदान करण्यात आली. महिलांसाठी साडी वॉकथॉन नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शहरातील महिलांसाठी विशेष “तुळजाई रोटरी साडी वॉकथॉन” आयोजित करण्यात आली. साडी परिधान करून सजलेल्या महिलांनी स्त्रीशक्तीचा स्वाभिमान, ऊर्जा आणि सन्मानाचे प्रतीक म्हणून ३ किलोमीटर वॉकथॉन मध्ये उत्साहाने सहभाग घेतला. नगरसेविका प्रियंका विजय गंगणे यांच्या वतीने सहभागी महिलांना पर्स भेट देण्यात आली, तर रोटरी क्लबच्या वतीने मेडल देऊन गौरव करण्यात आला. या उपक्रमासाठी डॉ. श्वेता श्रीराम नरवडे, अॅड. स्वाती नळेगावकर, निर्मला संजय जाधव, , रुपाली अमोल गुंड, श्रुती संतोष लोखंडे व शुभांगी प्रशांत अपराध यांनी विशेष प्रयत्न केले. नामांकित धावपटूंची उपस्थिती मॅरेथॉनमध्ये धाराशिवचे सुपुत्र व आयर्न मॅन कॉम्रेड शाम शिंदे, दत्तात्रय टेकाळे, अमोल माने, प्रदीप खामकर यांच्यासह अनेक धावपटू सहभागी झाले. तसेच एक दिवसात अधिक चालण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड करणारे कॉम्रेड अंकित गर्ग, देश-विदेशात मॅरेथॉन धावलेले कॉम्रेड संतोष भोकरे, अल्ट्रा मॅरेथॉन धावपटू अभिजीत वाघचौरे (बीड) आणि पुरुषोत्तम रूकमे (लातूर) यांनी जवळपास ९० जणांच्या टीमसह सहभाग घेतला. विजेत्यांचा सत्कार मॅरेथॉनमधील विजेत्यांना तहसीलदार अरविंद बोळंगे, मंदिर व्यवस्थापक माया माने, पीएसआय चौधर, पोटे, नगराध्यक्ष विनोद पिटू गंगणे, नगरसेवक आनंद जगताप, चिन्मय मगर, डॉ. श्रीराम नरवडे व रोटरीयन प्रशांत अपराध यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. रोटरी सदस्यांचे विशेष योगदान या मॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनासाठी भरत जाधव, पुष्कर रोकडे, अर्जुन गवळी, अभिषेक जाधव, अभिषेक कदम, गुरुराज डोंगरे, अरविंद भोसले, स्वप्नील भोसले, तुषार सुत्रावे, अक्षय जाधव, बालाजी ढोबळे, चेतन बोबडे, परिचय जाधव, प्रशांत संकपाळ, डॉ. किरण पवार, संभाजी मुळे, अनिल रोज, सुजित नाईक, सुरेश परमेश्वर, दत्ता अंबर,संजय जाधव, ऋषिकेश हंगरगेकर, रोहित चव्हाण, अमोल गुंड, निखिल साळुंके, डॉ विकास क्षीरसागर, संजय शिंदे, परिचय जाधव, रामचंद्र गिड्डे, अनिल रोचकरी, शरद जगदाळे यांच्यासह सर्व रोटेरियननी विशेष मेहनत घेतली. मॅरेथॉनचा मार्ग मॅरेथॉनसाठी वेगवेगळे मार्ग निश्चित करण्यात आले होते. ३ किलोमीटर साठी तालुका क्रीडा संकुल ते मलबा स्टॉप व परत, ५ किलोमीटर साठी तालुका क्रीडा संकुल – बसस्थानक – मलबा स्टॉप – कनिष्ठ कॉलेज – आणि परत, तर १० किलोमीटर साठी तालुका क्रीडा संकुल – धाराशिव ब्रिज – तुळजापूर घाट – छत्रपती शिवाजी महाराज चौक – आणि पुन्हा क्रीडा संकुल असा मार्ग निश्चित करण्यात आला होता. आरोग्य, व्यायाम आणि सामाजिक एकजुटीचा संदेश देणारी तुळजाई रोटरी मॅरेथॉनचे पहिले वर्ष अत्यंत यशस्वी आणि दिमाखदाररीत्या पार पडले, अशी प्रतिक्रिया आयोजकांनी व्यक्त केली.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.