धाराशिव येथे भिम-अण्णा सामाजिक संघटनेचे निवेदन; कचरु सगट यांच्यावरील हद्दपारी रद्द करण्याची मागणी. धाराशिव येथे हद्दपारी कारवाई रद्द करण्यासाठी व मातंग समाजावरील अन्यायाविरोधात निवेदन


धाराशिव, दि. 02 मार्च 2026 — भिम-अण्णा सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने आज धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून जिल्हा परिषद निवडणूक लढविलेल्या पराभूत उमेदवार कचरु सगट यांच्यावर करण्यात आलेली हद्दपारीची कारवाई तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. संबंधित कारवाई अन्यायकारक असून ती मागे घ्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच मातंग समाजावर वाढत्या अन्याय व अत्याचाराच्या घटनांबाबत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
या प्रसंगी समस्त मातंग समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता व त्यांनी प्रशासनाकडे न्याय्य कारवाईची मागणी केली.