तुळजापूर तालुका पंचायत समिती सभापतीपदी विक्रम मालक देशमुख यांची निवड. तुळजापूर तालुका पंचायत समितीला नवे सभापती – विक्रम मालक देशमुख सभापतीपदी निवड झाल्याबद्दल विक्रम मालक देशमुख यांचा बोधले यांच्या हस्ते सत्कार

 

तुळजापूर तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष विक्रम मालक देशमुख यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव बोधले यांच्या हस्ते विक्रम मालक देशमुख यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विक्रम मालक देशमुख यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.