तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे क्रिकेट प्रीमियर स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ



तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट प्रीमियर स्पर्धेचे उद्घाटन मधुकर शेळके (नगरसेवक, तुळजापूर नगर परिषद) यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.

या स्पर्धेत तुळजाई 11, आरव 11, श्री गणेशा 11, महाकाल 11 आणि भिसे ब्रदर्स 11 या संघांचा सहभाग असून परिसरात क्रीडा वातावरण निर्माण झाले आहे. सर्व संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी लोकमंगलचे संचालक सचिन आरगडे, सामाजिक कार्यकर्ते राहुल साळवे, पत्रकार संजय गायकवाड, युवा नेते अशोकराव देवगुंडे, युवा नेते उमेश खांडेकर, युवा नेते चेतन बंडगर, गणपत पाटील, अमर झाडे, मेहराज शेख, प्रसाद मोरे, बबन घोगरे, पवन वाघमारे, गोविंद साठे, राजकुमार भिसे, सौरव भिसे, समाधान देवगुंडे तसेच सर्व क्रिकेट संघांचे खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेमुळे काक्रंबा परिसरात क्रीडा चैतन्य निर्माण झाले असून पुढील काही दिवस रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत.