मौजे घाटंग्री येथील अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय, धाराशिव यांनी पाच आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. या प्रकरणात महादेव निवृत्ती होनमाने व इतर चार आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. सदर प्रकरणात एकूण आठ आरोपी असून त्यापैकी पाच आरोपींना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. आरोपींच्या वतीने ॲड. व्ही. बी. एडके यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद मांडला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करण्याचा निर्णय दिला. या प्रकरणात ॲड. एडके यांनी बारकाईने काम केल्याचे सांगितले जात आहे. घटनेची पार्श्वभूमी : दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे 9:30 सुमारास संत बाळूमामा मंदिरात फिर्यादी याची मावशी यांची पंगत असल्याने फिर्यादी तेथे गेले होता . त्यावेळी भाजी वाढत असताना सुहास शिंदे हा तेथे आला व त्याने फिर्यादीला लाथ मारल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात आले आहे. तक्रारीनुसार त्यावेळी अजय सतीश हराळे, विकास तानाजी हराळे, गोविंद होनमाने, महादेव होनमाने, सिद्धनाथ बिचकुले, वैभव राज थोरात, धनाजी सलगर व पिंटू शिंदे यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सुहास शिंदे याने कोयत्याने व अजय हराळे यांनी लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम 118(2), 115(2), 189(2), 191(2), 191(3), 190 तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत कलम 3(1)(r) व 3(1)(s) अन्वये गुन्हा क्रमांक 40/2026 दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपींच्या वतीने दाखल करण्यात आलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय, धाराशिव यांनी मंजूर केला आहे.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.