पिंपळा (बु) येथील सोहम कोकरे या विद्यार्थ्याचे घवघवीत यश. सामान्यज्ञान स्पर्धेत केंद्र आणि तालुक्यात प्रथम, जिल्ह्यात 9 वा तर राज्यात 14 वा

 

तुळजापूर / प्रतिनिधी,
पिंपळा (बु), ता. तुळजापूर येथील चि सोहम कोकरे इयत्ता 1 ली या विद्यार्थ्याने मंथन सामान्यज्ञान स्पर्धेत केंद्र आणि तालुक्यात प्रथम, जिल्ह्यात 9 वा तर राज्यात 14 वा क्रमांक पटकवून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 
समस्त पिंपळा (बु) ग्रामस्थांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट असल्यामुळे या विद्यार्थ्याचा सत्कार सर्वांच्या वतीने शाळेमध्ये करण्यात आला. जि. प. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी अशीच प्रगती करत सर्वोच्च शिखरे गाठावीत अशा भावना यावेळी उपस्थित नागरिकांच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या.
याप्रसंगी पं. स. सदस्या सौ. संगिता गवळी, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, सरपंच सौ. गीताताई वाघमोडे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष बालाजी चुंगे, ग्रा. पं. सदस्य संग्राम राजेपांढरे, बागायतदार रामदास चौगुले, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग म्हेत्रे, प्रशांत कोकरे, माजी सरपंच सौ. उषा वाघमोडे, रिजवाना शेख यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व अनेक नागरिक उपस्थित होते.