तुळजापूर बाजार समितीच्या सभापतीपदी संतोष दादा बोबडे बिनविरोध. संतोष दादा बोबडे यांची सभापतीपदी एकमताने निवड

 


तुळजापूर, दि. 20/04/2026 (सोमवार) : तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त झालेल्या सभापती पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, तुळजापूर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक घेण्यात आली.
सभापती पदासाठी सकाळी 11.00 वा. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात आले. सकाळी 11.10 वा. मा. संतोष दादा बोबडे यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला. सदर पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने प्राधिकृत अधिकारी श्री. के. एम. जगताप यांनी संतोष दादा बोबडे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
यावेळी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून श्री. अजित जाधव यांनी काम पाहिले. या प्रसंगी तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विनोद पिंटू भैय्या गंगणे, मा. सभापती श्री. विजय सर गंगणे, श्री. आदित्य बेंगळे, श्री. सचिन पाटील, उपसभापती श्री. सुहास गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य सिद्धेश्वर कोरे, श्री. दीपक दादा आलुरे, श्री. प्रशांत लोमटे, सौ. सोनल जाधव, सौ. ताराबाई पवार, विजय शिंगाडे, अशोक पाटील, संजय भोसले, सुनील जाधव, श्री. रामचंद्र ढवळे, श्री. दत्ता कांबळे, श्री. दत्ता घाडगे, संचालक,तसेच आनंद दादा कंदले, वसंत दादा वडगावे, सचिव उमेश भोपळे, शिवानंद राठोड, नागनाथ देशमुख, पी. पी. पाटील, लिंबाजी सरडे, एकनाथ जमादार यांच्यासह तालुक्यातील व्यापारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.