तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी संतोष दादा बोबडे यांची निवड संतोष दादा बोबडे यांच्यावर सभापतीपदाची जबाबदारी; सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

तुळजापूर, दि.२० एप्रिल २०२६. — तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी संतोष दादा बोबडे यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत असून विविध मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संतोष दादा बोबडे यांनी यापूर्वीही सामाजिक व कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून त्यांच्या अनुभवाचा फायदा बाजार समितीच्या कामकाजात निश्चितच होणार आहे, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या निवडीमुळे शेतकरी व व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवीन सभापती म्हणून त्यांनी बाजार समितीचा कारभार अधिक पारदर्शक, कार्यक्षम व शेतकरीहिताचा करण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच शेतकऱ्यांना योग्य दर, सुविधा व बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.