जन्मत: मृत स्त्री अर्भकाची अयोग्य विल्हेवाट; महिलेविरुद्ध, आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


धाराशिव : जन्मत: मृत अवस्थेत जन्मलेल्या स्त्री अर्भकाची अयोग्य प्रकारे विल्हेवाट लावल्याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुनिता प्रज्योत उंदरे (वय 40 वर्षे, रा. वाशी, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी दिनांक 09 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 00.24 वा. सुमारास जिल्हा स्त्री रुग्णालय, धाराशिव येथे जन्मलेल्या मृत स्त्री अर्भकाची योग्य पद्धतीने अंत्यविधी न करता, अपत्य जन्माची लपवणूक करण्याच्या उद्देशाने अर्भकास निळ्या रंगाच्या पॉलिथीन पिशवीत टाकून अयोग्य प्रकारे विल्हेवाट लावल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सत्यवान लक्ष्मण आगरकर, पोलीस ठाणे आनंदनगर यांनी दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून भारतीय दंड संहिता कलम 94 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास आनंदनगर पोलीस करत आहेत.