महात्मा बसवेश्वर जयंती तुळजापूरात उत्साहात साजरी, बसवेश्वर चौकात प्रतिमापूजन; महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त समाजबांधवांची मोठी उपस्थिती



तुळजापूर, दि. 19 —
१२ व्या शतकातील थोर क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांची जयंती तुळजापूर शहरात विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली.
नळदुर्ग रोडवरील महात्मा बसवेश्वर चौकात सकाळी उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी व विशाल रोचकरी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.


तसेच वीरशैव जंगम मठात सेवानिवृत्त मुख्याध्यापक गौरीशंकर साखरे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास अॅड. गिरीश शेटे, गुरुनाथ बडुरे, महाबळेश्वर तोडकरी, प्रफुल्ल मस्के, विश्वनाथ शेटे, महादेव तोडकरी, कैलास मस्के, सचिन नाडापुडे, लक्ष्मण उळेकर, अॅड. मंगेश नाडापुडे, मनोज गवळी, नागेश लकशेट्टी, भारत कोप्पा, राजू धरणे, नागनाथ गिराम, अभिषेक कोरे, हनुमंत भुजबळ, महेश नडमने, राहुल साखरे, पवन कोरे, प्रसाद वाले, विठ्ठल हुच्चे, प्रदीप कुंभार, अॅड. अंजली साबळे, अस्मिता शेटे, वैशाली धरणे, शुभांगी करीशेट्टी, राजश्री धरणे, हिराबाई उळेकर, वैशाली बडुरे, प्रियंका मस्के, विजया शेटे यांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, नगरपरिषद कार्यालयातही उपाध्यक्ष रामचंद्र रोचकरी, नगरसेवक पंडितराव जगदाळे व विशाल रोचकरी यांच्या उपस्थितीत महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील विविध शासकीय कार्यालये तसेच विविध संघटनांच्या वतीनेही महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.