तुळजापूर तालुक्यातील मौजे कदमवाडी येथे सरकारी जागेवरील अनधिकृत बांधकामाच्या कारणावरून झालेल्या मारहाण प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीस धाराशिव येथील माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कदमवाडी येथे घडलेल्या या घटनेत फिर्यादीने सरकारी जमिनीवरील अवैध बांधकामाबाबत विचारणा केली असता आरोपीने शिवीगाळ करत फिर्यादीच्या डोक्यात विटांनी प्रहार करून गंभीर दुखापत केल्याची नोंद आहे. या प्रकरणी तामलवाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 110, 118 (2) व 352 अन्वये सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आरोपीच्या वतीने ॲड. ओंकार नारायणराव मस्के यांनी अभ्यासपूर्ण व प्रभावी युक्तिवाद सादर केला. त्यांनी गुन्हा दाखल करण्यात झालेला विलंब तसेच फिर्यादीतील त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. या सर्व बाबींचा विचार करून माननीय न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला. या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. ओंकार नारायणराव मस्के, ॲड. सोनाली नकाते मस्के व ॲड. रामानंद गुळमिरे यांनी काम पाहिले.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.