धाराशिवमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय अभियानाला बळ; ॲड. अनिल काळे यांची जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती जिल्हा प्रशिक्षण वर्ग प्रमुखपदी ॲड. अनिल काळे; अभियान अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा

 

धाराशिव, प्रतिनिधी : पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महा अभियानांतर्गत धाराशिव जिल्हा प्रशिक्षण वर्ग प्रमुख पदी ॲड. अनिल काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ॲड. अनिल काळे यांना मिळालेली ही जबाबदारी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात असून, त्यांच्या अनुभव व नेतृत्व गुणांच्या बळावर हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील कार्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.