तुळजापूर शहरातील नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कोटी रुपयांच्या रस्ते कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित ठेकेदाराने खोटी व बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करत नगरसेवकांनी प्रशासनाकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे.
नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनानुसार, औरंगाबाद येथील के. एच. कन्स्ट्रक्शन या कंपनीकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये अनेक विसंगती आढळून आल्या आहेत. कागदपत्रांमध्ये फेरफार करून काम मंजूर करून घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, त्यासंदर्भातील पुरावेही निवेदनासोबत जोडण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने तत्काळ चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दोषी आढळल्यास संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या संदर्भात गटनेते अमोल माधवराव कुतवळ, नगरसेवक रणजीत चंद्रकांत इंगळे, आनंद नानासाहेब जगताप, अक्षय धनंजय कदम, प्रगती गोपाळ लोंढे आणि ऋषिकेश मगर यांनी संयुक्तपणे स्वाक्षरी करून प्रशासनाला निवेदन सादर केले आहे.
दरम्यान, नगरोत्थान योजनेतील या वादग्रस्त प्रकरणामुळे तुळजापूर शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि चौकशीची दिशा काय ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.