ढोलकी सम्राट निलेश भाऊ देवकुळे यांचा नाथ गौरव पुरस्कार 2026 ने सन्मान पुण्यात रंगला नाथ गौरव सोहळा; नामांकित गायकांच्या उपस्थितीत देवकुळे यांचा गौरव


महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व लाडके ढोलकी सम्राट निलेश भाऊ देवकुळे यांना ए एन म्युझिक प्रोडक्शन (A N Music Production) तर्फे आयोजित वर्ष २ रे नाथ गौरव पुरस्कार सोहळा 2026 मध्ये सन्मानित करण्यात आले.
हा मानाचा पुरस्कार महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक साजन बेंद्रे, रंजीत खंडागळे, सोनू साठे व आकाश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी अतुल भाऊ नाडे व शतुल भाऊ नाडे यांच्या हस्ते निलेश भाऊ देवकुळे यांचा गौरव करण्यात आला.

पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ व ट्रॉफी असे होते. हा भव्य सोहळा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन ए एन म्युझिक प्रोडक्शनचे सर्वेसर्वा अतुल भाऊ नाडे व शतुल भाऊ नाडे यांनी उत्कृष्टरीत्या केले. कार्यक्रमाला कलाकार, संगीतप्रेमी व मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली होती.