तुळजापूर तालुक्यात गॅस व पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत करण्याबाबत, मकबूल तांबोळी यांचे निवेदन.

  


तुळजापूर : तुळजापूर तालुक्यात व शहरात घरगुती गॅस तसेच पेट्रोल-डिझेलच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस बुकिंग करूनही १० ते २० दिवस सिलेंडर घरपोच मिळत नसल्याने नागरिकांना एजन्सीवर जाऊन तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे.
यासोबतच तुळजापूर शहर व तालुक्यातील पेट्रोल पंपांवरही पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, पुरवठा कमी असल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे. या परिस्थितीचा दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून, तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.


आगामी काळात गॅस व इंधन टंचाई गंभीर रूप धारण करू नये, यासाठी शासनाने गॅस, पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत व जलद करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती पावले उचलावीत, असेही नमूद करण्यात आले.
दरम्यान, आखिल भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य सचिव मा. तांबोळी मकबुल आल्लाउद्दीन यांनी धाराशिव जिल्हाधिकारी व तुळजापूर तहसीलदार यांना निवेदन सादर करून नागरिकांच्या समस्येकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे.