धाराशिव दि. 6 (प्रतिनिधी) भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा, प्रत्येक बूथवर उद्योजक घडविण्याचा संकल्प धाराशिव येथील भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय येथे भाजपा चा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात संपन्न झाला. आमदार राणा जगजितसिंह पाटील तसेच जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांची या सोहळ्यास प्रमुख उपस्थीती होती, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी खंडेराव चौरे, सुरेश देशमुख, नितीन काळे, अॅड. अनिल काळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा सरचिटणीस नितीन भोसले, सौ. अस्मिता कांबळे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ प्रितीताई कदम हे मान्यवर उपस्थित होते. प्रत्येक बुथवर एखादा तरी छोटा मोठा उद्योजक तयार करण्याचा संकल्प यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला. ४६ वर्षामध्ये पक्ष संघटनेच्या अनेक मान्यवरांनी आपल्या त्याग, परिश्रम व अथक प्रयत्नातून पक्षाचे विचार तळागळात पोहचवण्याचे काम केले. त्यामुळेच आज आपण जिल्ह्यात, प्रदेशात व केंद्रात सत्तेवर आहोत,असे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी विचार मांडले. या प्रसंगी जिल्ह्यातील सर्व भागांतील पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख व बूथ स्तरावरील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.