सुमारे 1 कोटी 19 लाख रुपयांच्या पवनचक्की साहित्य चोरी व नुकसान प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर


तुळजापूर : धाराशिव जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पवनचक्कीवरील तांब्याच्या तारा व इतर साहित्य चोरी आणि नुकसान प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिकुंद्रा व गंधोरा शिवारातील पवनचक्कींवर कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकांना चकवा देत ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा व इतर साहित्य चोरी करून सुमारे 1 कोटी 19 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान करण्यात आल्याचा आरोप होता.
या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गु.र.नं. 11/2026, 328/2025 व 449/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2), 324(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना 23 एप्रिल 2026 रोजी अटक केली होती.
दरम्यान, आरोपींच्या वतीने ॲड. विराज विलासराव जगदाळे यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद करत आरोपींची बाजू भक्कमपणे मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला.
या प्रकरणात जेष्ठ विधीज्ञ संजय पवार यांचे मार्गदर्शन लाभल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यात गाजलेल्या या प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयानंतर पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.